मी हाय कोळी!
नमस्कार
मी हाय कोळी! हो खरच मी कोळी आहे आणि मला त्याचा गर्व आहे. मी खार दांडा इथे राहतो. खार दांडा हि कोळ्यांची वस्ती होती पण आता इथे सर्व प्रांतातील लोक राहतात, आणि आनंदाने राहतात. कोळी म्हणजेच माशेमार, जे मच्छी पकडतात अंड तुम्ही मग ती मच्छी फ्राय करून खाता.
कोळी लोकान मध्ये पुरुष मासे पकडायला समुद्रात जातात आणि त्यांनी पकडून आणलेले मासे घरातल्या बायका बाजारात नेऊन विकतात. तुम्हाला माहित आहे का कि आम्हाला कोळी का म्हणतात? नाही? मग मी सांगतो, आमचे जे मच्छी पकडायचे जाले असते ते आम्ही स्वतः विणतो, आणि ते कोळ्याच्या जाल्या सारखे दिसते, म्हणून आम्हाला कोळी म्हणतात.
आमचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे नारळी पोर्णिमा. या दिवशी आम्ही समुद्राला नारळ अर्पण करतो कारण या दिवसा नंतर समुद्राच्या लता कमी होतात आणि मासे पकडायचा सिसन चालू होतो. आणि नारळ देऊन आम्ही समुद्राला सांगतो कि आमच्या लोकांचे रक्षण कर.
कोळी हे मुंबईचे सर्वात जुने वसाहत करणारे लोक आहेत. आणि मुंबईचे नाव सुद्धा मुंब देवी या देवीच्या नावावरनं पडलं आहे.
आशुतोष मोरू