Biography of PadmaShri Anhnasaheb Pandurang Dharmaji Jadhav - Social Reformer
This resources is about the biography of PadmaShri Anhnasaheb Pandurang Dharmaji Jadhav.
biography of PadmaShri Anhnasaheb Pandurang Dharmaji Jadhav - पद्मश्री अण्णासाहेब पांडुरंग धर्माजी जाधव
जन्म व बालपणः
अण्णासाहेबांचा जन्म 9/9/1922 रोजी वाडा तालुक्यातील कुडूस या गावी एका गरीब कुटुंबात झाला. तो दिवस सोनियांचा दिन म्हणून संस्थेच्या इतिहासात नोंदविलेला आहे. अण्णांचे प्राथमिक षिक्षण 3री पर्यंत कुडूस या गावीच झाले. परंतु तिथे मात्र इयत्ता 3री पर्यंतच षिक्षण होते. त्यांना षिक्षणाची आवड होती. परंतु त्यांना षाळेतच उषिरा घातले. अभ्यासात चांगली गोडी असल्याने अभ्यासात त्यांना रुची वाटू लागली. षाळा षिकता षिकताच त्यांना सकाळी उठून गुरांचा चारापानी पासून ते षेतातली सर्व कामे करावी लागत असत. त्यांना षिक्षणाची फार हौस होती. ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. इच्छा असेल तिथे मार्ग दिसतो हा कित्ता अण्णांनी लहानपणातच गिरवला व उषिरा का होईना परंतु प्राथमिक षाळेत प्रवेष घेतला.
प्राथमिक षिक्षणाचा श्री गणेषा सुरु झाला खरा परंतु गावी 3री पर्यंतच षिकता येत होते. 4थी चा वर्ग नसल्याने त्यांची त्यामध्ये 4 वर्षे वाया गेली घरीच बसावे लागले परंतु त्यांची ज्ञानाची लालसा त्यांनाकाही चैन पडू देत नव्हती. मार्ग खुंटल्याने ते बेचैन झाले. परंतु जवळच असणा-या चिंचघर या गावी 4थी चा वर्ग सुरु झाला होता. तिथे जावून त्यांनी इयत्ता 6वी पर्यंत षिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गो-हे या गावी 7वी ला प्रवेष घेतला व 7वी पर्यंतचे प्राथमिक षिक्षण त्यंानी पूर्ण केले. 1940 साली ते ठाणे जिल्हयातून प्राथमिक षाळा प्रमाणपत्रात ते पहिले आले. षिक्षणाची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना त्यावेळी त्यांचे गुरुवर्य श्री. पां.ल.चोडणेकर यांनी ख-या अर्थाने त्यांना षिक्षणामध्ये गोडी निर्माण केली. त्यांचबरोबर त्यांच्या आई सौ. अंबिकाबाई याही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांच्या प्रोत्साहनावरच अण्णा धावत होते. त्यांना त्यांची आई म्हणायची ''बाबारे सर्व काही नषिबात असेल तसे मिळते तु षिकून पार मोठा होषील नाव कमावषील'' षिकल्याने माणूस मोठा होतो एवढेच त्यांना माहित होते एवंढच.
अण्णा षिक्षणासाठी बाहेरगावी पुण्याला गेले त्यावेळी त्यांच्या आईला फार वेदना होत असत. आईचे काळीज ते काळजी करणारच. परक्या गावात आपला लेक जातोय कसा राहतो, काय खातो, कुठे झोपतो ही काळजी त्या माऊलीला होती. अण्णांना आईचे प्रेम जास्त दिवस मिळू षकले नाही. दि. 18 मे 1969 साली त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले व अण्णा आईविना पोरके झाले. पुढे सर्व कार्यकत्र्यांनी आईची आठवण म्हणून वज्रेष्वरी येथील कन्या छात्रालयास कै. अंबिकाबाई जाधव कन्या छात्रालय असे नाव देण्यात यावे असे ठरविले व त्याचे नाव बदलले. अण्णा हे लहानपणापासूनच स्वच्छताप्रिय, टापटीप राखनारे होते. अण्णाचे वडील कै. धर्माजी जाधव हे सुध्दा अगदी प्रेमळ स्वभावाचे होते. अण्णांचे षिक्षण बहुतांषी षिष्यवृत्तीवरच होत असे त्यावेळी त्यांच्या वडीलांनी त्यांच्या पाठीमागे खबीरपणे उभे राहून प्रेमाची पाठराखण केली वडीलांचे ही अण्णांवर खुप प्रेम होते. वयाच्या 105व्या वर्षी कै. धर्माजी जाधव यांचे निधन झाले. त्यावेळी अण्णांचे वय 58 वर्षे होते.
अण्णा ज्यावेळी माध्यमिक षिक्षणासाठी पुण्यामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या जिवनाला एक वेगळे वळण मिळाले. त्यांना त्यावेळी महाराष्ट्रªाचे गांधी म्हणून त्यांना ओळखायचे असे कै. हरीभाऊ फाटक व मराठीचे अध्यापक श्री.म.माटे या दोन थोर व्यक्तींचा सहवास त्यांचे संस्कार त्यांना मिळाले ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडले. मॅट्रªªीकनंतर अण्णांना वाटले की आता काहीतरी समाजाच्या व आपल्या उपयोगी असा कोर्स करावा या उद्देषाने त्यांनी मुंबई येथे बांद्रा स्कुल टेक्नोलाॅजीसाठी 1945 ला प्रवेष घेतला व तो 1945 साली पूर्ण ही केला. त्यानंतर त्यांना चांगल्या कंपन्यामध्ये नोकरीही लागत होती. परंतु त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले असल्याकारणाने ते त्यांनी स्विकारले.
संस्था व सामाजिक कार्याची मुहुर्तमेढः
समाजासाठीच स्वतःहाला वाहून घ्यायचे आपण घेतलेले षिक्षण ज्ञान हे इतरांना दयायचे त्यांच्या घरामध्ये ज्ञानाचा दिवा लावायचाच या उद्देषाने 8 जून 1948 रोजी स्वतःहाच्या जन्मगावी कुडूस येथे एका झोपडीवजा घरामध्ये आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थेचे रोपटे कुडूस या गावी लावले व त्यानंतर 6 मार्च 1949 रोजी यंत्रमागाचे षहर व श्रमजीवी लोकांचे ठिकाण भिवंडी या ठिकाणी 20 मुलांसह वसतीगृहाची स्थापना करण्यात आली.
स्वतःहास षिक्षण घेतांना येणा-या असंख्य अडीअडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या त्या आपल्यातील इतरांना जानवू नयेत या ध्येयाने प्रेरीत होऊन षिक्षणाची सोय करण्यासाठी अण्णांनी आपल्या संस्थेची स्थापना केली. यावेळी अण्णांनी आपले षिक्षण संपवले त्याचबरोबर संस्थेचे कार्य सुरु केले. अल्पावधीमध्ये आपल्या समविचारी सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांनी षिक्षण क्षेत्रात आपल्या नावाचा व कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करण्यात यष मिळवले. अण्णांनी जो संकल्प केला ज्ञानरुपी दिवा सामान्यांच्या घरात लावण्याचा तो त्यांनी ध्येयाने प्रेरीत होऊन पूर्ण केला. त्यासाठी त्यांना असंख्य अडीअडचणी आल्या त्यावर त्यांनी आपल्या सहकार्यांना बरोबर घेऊन त्या त्यांनी पूर्ण केल्या.
संस्थेचे नामकरण व विस्तार:
अण्णांनी स्थापन केलेली वाडे तालुका हरिजन उन्नति मंडळ त्यांचा विस्तार नंतर ठाणे जिल्हा हरिजन गिरीजन समाज उन्नति मंडळ ते भारतीय हरिजन गिरीजन समाज उन्नति मंडळ असे संस्थेचे नामकरण झाले व संस्था आपली त्यांनी भारतीय पातळीवर म्हणजेच देषपातळीवर त्यांनी पोहचवली.
अण्णांनी त्यांच्या कामात येणा-या अडीअडचणींना त्यांनी एखादया गुरुप्रमाणे मानले. गरज ही षोधाची जननी आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वाला श्रमाची जोड दिली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयवादाची, स्वाभिमानाची, स्वावलंबनाची जिज्ञासा उरी बाळगून त्यांच्या षैक्षणिक कार्यात अडीअडचणींना त्यांना सामोरे जावे लागले होते. त्याचप्रमाणे जरी वसतीगृह उभारले असले तरीही आपली स्वतःहाची षाळा असावी त्यातील मुलांना त्याषाळेत प्रवेष मिळावा या उदात्त हेतूने त्यांनी वसतीगृहाच्या जोडीला 15 जून 1959 रोजी त्यावेळी मुंबई राज्याचे राज्यपाल कै. श्री. प्रकाष यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले व समारंभासाठी अण्णांचे श्रध्दास्थान असलेले बाबू जगजिवनराम यांचा आषीर्वाद अण्णांना होता. त्यांच्या आषीर्वादामुळे अण्णांचे आणि पर्यायाने संस्थेची भरभराट झाली. 1959 ते 1961 या कालावधीमध्ये संस्थेच्या कार्याचा व्याप खूपच वाढत गेला. संस्थेच्या षाखांचा पसारा 77 षाखांपर्यंत वाढला.
संस्थेच्या प्रगतीची वाटचाल:
अण्णाांच्या कार्याची ही वाटचाल म्हणजे प्रवासातील एक एक टप्पा गाठण्याचा प्रयत्न आणि तो यषस्वीपणे गाठला जात होता. अण्णांच्याच भाषेत बोलायचे झाल्यास मंदीर ते खूप दूर आहे. त्या मंदीरापर्यंत पोहचण्याचा दृढसंकल्प आहे. त्या मंदीरात पुजा बांधावयाची आहे. ती सत्य, षिव आणि सुंदर यांचे सरस्वतीच्या या मंदीरात दर्षन इच्छुक घेतील क्षणभर विचारमग्न होतील असा चांगला द्रष्ठा विचार घेऊनच अण्णांनी ही संस्था स्थापन केली आणि ती वाढवली किती सुंदर विचार तो आणि तो
त्यांनी अंमलातही आणला. पण सर्वसामान्य दिनदलीत जनतेसाठी त्यांच्या मुलांच्यासाठी ज्ञानाची कवाडे खुली त्यांनी करुन दिली अण्णांनी आपली संस्था तालुका, जिल्हा व राज्य पातळीपर्यंत न ठेवता अण्णांनी आपल्या षाखांचा विस्तार संपूर्ण भारतभर करण्याचा माानस ठेवला आणि त्या दृष्टीने ते कामासही लागले.
अण्णांचा सामाजिक कार्याचा वसाः
घेतला वसा टाकू नये उतू नये मातू नये या उक्तीप्रमाणे अण्णांनी घेतलेले हे सामाजिक कार्याचे व्रत त्यांनी षेवटपर्यंत पेलले ते मोठे षिव धनुष्यच होते. परंतु त्याला त्यांनी पेलून त्यांच्या अंगी असणारे कर्तृत्व त्यातून स्पष्ट होते. नाहीतर मनुष्यप्राणी जन्मास येतोच परंतु तो किती वर्ष जगला हे महत्वाचे नाही त्यापेक्षा तो जिवन कसे जगला व इतरांसाठी किती झिजला हे महत्वाचे सामान्य कुटंुबात जन्माला आलेले अण्णासाहेब आपल्या कर्तृत्वाने फार मोठे झाले. त्यांनी सेवा धर्म निवडला. ज्ञानाचा उपासक ते झाले. सेवेने मानसांचे अंतकरण जिंकता येते हा दृढविष्वास त्यांच्या मनात होता. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून षिक्षण व पालन पोषण झालेले अण्णासाहेब हे होत. अण्णासाहेबांच्यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, साने गुरुजी, महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर जबरदस्त प्रभाव होता. त्यामुळे या महापुरुषांनी जो सेवेचा ज्ञानाचा महामार्ग आखून दिला होता. त्याबरहुकुम अण्णासाहेबांनी आपले समाजसेवेचे व्रत सुरु ठेवले होते. ग्रामीण आणि अतिदुर्गम अषा खेडयापाडयात अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला एकत्र करुन त्यांच्यामध्ये एकीचा मोह बांधून आणि त्यांना ज्ञानाची महती पटवून देण्यात अण्णा यषस्वी झाले. त्यांच्या मुलाबाळांची षिक्षणाची सोय व्हावी त्या समाजाने आपल्या प्रगत इतर समाजाबरोबर वाटचाल करावी म्हणून अण्णांनी षिक्षणाचा वसा घेतला. व या समाजाला षिक्षणाची व ज्ञानाची कवाडे उघडून दिली. त्यांच्या समोर त्यासाठी आदर्ष होते. डाॅ. महात्मा फुले, डाॅ. आंबेडकर कारण प्रत्येक महापुरुषाला समाजाच्या विरोधाचा सामना करावाच लागतो. तो अण्णानाही थोडाफार झालाच आहे.
परंतु कोठेही न थांबता मागे न पाहता अण्णासाहेबांनी अज्ञानरुपी अंधकार दुर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा घेवून अण्णासाहेबांनी त्या दिव्याची ज्योतीचा प्रकाष दिनदलीत, गरीब समाजाच्या षेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचा अण्णांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यषस्वी झाले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. आपले समाजकार्य थांबू नये यासाठी ऊन,वारा पाऊस याची तमा न बाळगता अखंडपणे अण्णा फिरत राहिले. मित्रांनो त्या काळी प्रवासाची साधने सर्वदूर कुठे उपलब्ध होती. परंतु त्यांची त्यांनी फिकीर केली नाही. ठाणे जिल्हयाचा दुर्गम भाग म्हणजे जंगळप्रदेष परंतु अण्णांनी दुर्गम भागातील लोकांच्या पर्यंत आपले कार्य पोहचविण्यासाठी दगडगोटयातून प्रवास केला. बैलगाडीतून प्रवास केला व ठाणे जिल्हयाच्या दुर्गम भागात आपल्या संस्थेच्या षाळांचे जाळेच अण्णांनी विनले. त्या दलीत वस्त्यामध्ये, आदिवासी पाडयांमध्ये अण्णासाहेबांनी पाळणाघरे, बालवाडया, संस्कारकेंद्रे आणि षाळा उघडून त्या समाजावर त्यांनी चांगले संस्कार केले. '' पवित्र व्हायचे असेल तर जाळून घ्यावे लागते व अंकुरीत होण्यासाठी गाडून घ्यावे लागते'' या उक्तीप्रमाणे अण्णांनी समाजसेवेला स्वतःहाला बांधून घेतले होते हे मात्र नक्की.
समाजसेवा करीत असतांना अण्णासाहेबांनी समाजातील जातियतेच्या षृंखला तोडण्याचा प्रयत्न केला. त्या काळात दलित व सुवर्ण हा भेदभाव मानला जायचा अण्णांना तो मान्य नव्हता. दलितांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याचीही सोय नव्हती त्यासाठी अण्णासाहेबांनी पुढाकार घेतला अनेक गावामध्ये दलितांना चांगल्या पाण्याची सोय व्हावी म्हणून आपल्या बरोबर समविचारी सहकारी कार्यकत्र्यांना बरोबर घेऊन गावोगावी विहिरींची खुदाई त्यांनी केली आणि त्या त्यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केल्या. त्या काळामध्ये वज्रेष्वरी येथील देवीचे मंदीर अस्पृष्यांसाठी बंद होते. अण्णांना ते पटले नाही. कारण देवाला सर्व लेकरे समान याप्रमाणे अण्णांनी तेथे आपल्या कार्यकत्र्यांचा मोर्चा नेऊन मंदीर सर्वांसाठी खुले केले. अण्णांचे कार्य त्यावेळी समाज मनावर बिंबवनारे असेच होते. स्पृष्य, अस्पृष्यता समाजनिर्मित म्हणजे माणसांनी आपणहून निर्माण केलेल्या या गोष्टी आहेत. देवाला हे मान्य नाही. देवाला सर्व लेकरे समान असतात. हा विचार सर्वांवर बिंबवण्याचे महान कार्य अण्णांनी केले.
स्त्री षिक्षणापाई अण्णांची कृतीः
पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांनी समाजाच्या सर्व थरात षिक्षणाची गोडी निर्माण तर केलीच परंतु अण्णांनी डाॅ. जोतीबा फुले यांनी समाजाला षिक्षीत करतांना आपल्या स्वतःहाच्या घरापासूनच त्यांनी षिक्षणाची सुरुवात केली. आपली पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापासून त्यांनी षिक्षणाची सुरुवात केली. आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी स्त्रिषिक्षणात मोठी क्रांती केली. हे आपल्याला ज्ञात आहेच. याच धरतीवर अण्णासाहेब जाधवांनी आपल्या पत्नी सौ. उषाताई जाधव यांना विवाह झाल्यानंतर काही दिवसातच त्यांना पुणे येथील महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या हिंगणे स्त्रिषिक्षण केंद्रात त्यांना पाठवले. 3 वर्षे त्यांना तिथे षिक्षण घ्यावे लागले. या पाठीमागे अण्णांचा एकच दृष्टीकोन होता. माणसाच्या अंगी षिक्षणाने परिपक्वता येते. ज्याप्रमाणे एखादा मुलगा षिकला तर त्याला फायदा फक्त त्याच्यासाठी होतो. मात्र जर का एखादी मुलगी षिकली तर तिचा लाभ घरातील दुस-यासाठी सुध्दा होतो. अण्णांना स्त्रिषिक्षणाची महती माहित होती. म्हणून स्त्रियांना षिक्षण दिले पाहिजे. त्यांना स्वतःहा तयार केले पाहिजे. यासाठी त्यांनी आपल्या घरातूनच सुरुवात केली. ''स्वतःहा केले आणि मग इतरांना सांगितले'' या प्रमाणे आपल्या पत्नीलाही त्यांनी षिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. व स्त्रिषिक्षण किती महत्वाचे हे आपल्या समाजाला पटवून दिले.
संस्कारक्षम अण्णासाहेबः
अण्णासाहेबांच्यावर लहानपणापासुनच त्यांच्या मातोश्री अंबिकाबाई जाधव व वडील श्री. धर्माजी जाधव यांनी चांगले संस्कार केले होते. सर्व लहानथोरांषी प्रेमाने व आदराने वागावे नेहमी खरे ते बोलावे कधी कुणाला निंदू नये, उतु नये, मातु नये हे विचारांचे संस्कार अण्णांवर लहानपणापासुन त्यांच्या मातापित्यांनी केले होते.अण्णांच्या वडीलांचा अण्णांवर मोठा ठसा होतो. त्यांच्या आचरणाचे कारणही तसेच होते. अण्णा सांगतात की त्यांच्या वडीलांनी एकदा मुरबाड तालुक्यातील प्रसिध्द अषा म्हसांच्या यात्रेमध्ये एका व्यक्तीकडून दोन आणे उसणे म्हणून घेतले होते. त्यावेळी दोन आणे म्हणजे ब-यापैकी पैसे तर ते त्यांनी ते घेतले परंतु त्यानंतर बरेच दिवस त्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यांची आणि वडीलांची भेटच झाली नाही आणि त्या पैषाचे त्या व्यक्तीला स्मरणही राहिले नाही. परंतु अण्णासाहेबांचे वडील धर्माजी जाधव यांना मात्र आपण दोन आणे उसने घेतले आहेत. हे सारखे आठवत होते. योगायोगाने ती व्यक्ती कुडूस येथे वडीलांना भेटली त्यावेळी एकमेकाचे कुषलमंगल विचारुन अण्णांच्या वडीलांनी तात्काळ त्यांचे घेतलेले पैसे त्या व्यक्तीला परत केले. व त्यांना पैसे कधी घेतले होते. याची आठवण करुन दिली हे सर्व अण्णासाहेब तेथे समोर उपस्थित होते. त्यांच्यासमोर हे घडले. त्या व्यक्तीने अण्णांच्या वडीलांचा हात हातात घेतला कारण त्यांनाही आष्चर्यच वाटले. पण यातुन अण्णांना एकच गोष्ट षिकायला मिळाली. कुणाच्याही ऋणात राहू नये, कोणाचे घेतलेले ऋण बुडवू नये. अण्णांच्या बालमनावर तो संस्कार रुजला वडीलांच्याकडून हे चांगले असे संस्कार त्यांच्या आचरणातून आणि कामातुन वेळोवेळी त्यांना मिळत गेले. आईवडीलांचे हे चांगले विचारांचे संस्कारांचे मोती अण्णांनी आपल्या आचरणातून टिपून घेतले होते. आयुष्यभर अण्णांना त्यांचे आईवडील त्यांचे गुरुजन आणि त्यांच्यावर नेहमीच ज्यांच्या विचारांचा पगडा होता. असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, ज्योतिबा फुले इ. थोर पुरुषांचे विचारांचे संस्कार अण्णांवर झाले होते. तेच आयुष्यभर त्यांच्या कामी आले. आईवडीलांची पुण्याई व त्यांचे संस्कारामुळेच अण्णाही तितकेच संस्कारी, ज्ञानी, व्यवहारी व विनयषील असे व्यक्तीमत्व घडले. ते त्यामुळेच अण्णांना नेहमी साने गुरुजींचे विचार डोळयासमोर यायचे साने गुरुजी म्हणतात, जो मुलांचे रंजन करतो तो देवाषी नाते जुळवितो. साने गुरुजींच्या विचारांचा संस्काराचा पगडा अण्णांवर प्रचंड होता. अण्णा मुलगा किंवा मुलगी फरक मानत नव्हते. जातपात पाहत नसत. ब्राम्हण, चांभार, आदिवासी, कोळी व वंजारी या सर्व जातींची मुले अण्णांना आवडत होते. अण्णा म्हणत ही भूमी एक आहे माणसे एक आहेत. त्यांचे रक्त वेगळे कसे असणार एकच लाल रक्त मग माणसा माणसामध्ये मला कसा फरक करता येणार ही षिकवण त्यांनी साने गुरुजींकडून घेतली. त्यासाठी अण्णांनी गरीब मुलांना जवळ केले. त्यांना स्वच्छता टापटीप षिकवली. त्यांच्यावर हेच फार मोठे संस्कार केले गरीबीला कधी हिनवळ नाही. मुले ही देवाघरची फुले आहेत. हेच ग्राहय मानून त्यांना ज्ञान, स्वच्छता, भक्ती, थोरामोठयांचा आदर करणे, खरे बोलणे हे षिकवले जे अण्णांच्या जवळ संस्कार होते तेच संस्काराचे त्यांनी दान पुढच्यापिढीला दिले असे होेेते अण्णासाहेब संस्कारक्षम.
माझी आई:
आई म्हटले की प्रत्येकाला आपल्या आईचा चेहरा डोळया समोर तरळून जातो. कारण आई असतेच अषी की आपल्या बाळाची सर्वांगिण काळजी घेणारी ममतेची देवीच ती तषीच आपल्या अण्णासाहेबांची आई माना कै. अंबिकाबाई जाधव अण्णांना आईचे प्रेम जरा जास्तच मिळाले. ते आपल्या आई विषयी म्हणतात की आईच्या प्रेमाची सावली त्यांनी ख-या अर्थाने उपभोगली. मी खरा भाग्यवान आहे. कारण माझ्या षरीराची जषी आईने वाढ केली, त्याचबरोबर माझी मानसीक ताकदही आईने वाढवली. मानसिक बळ दिले ते माझ्या आईने.
आपल्या आईने आपल्याबद्दल काय काय केले या विषयी एक आठवण सांगतांना अण्णा सांगतात की लहानपणी अण्णा लवकर चालायला षिकले नाहीत. लोकांना वाटे की हा पांगळा होतो की काय. परंतु त्याची काळजी आईला आपले लेकरु पांगळे होऊ नये लवकरच ते दुडूदुडू चालावे यासाठी मातेने आपल्या या बाळासाठी एक पांगुळगाडा तयार केला आणि आपल्या हाताने धरुन त्याला हळूहळू तिने चालायला षिकवण्याचा प्रयत्न ती माऊली करत होती. हळूहळू तिने त्यांना चालायला षिकवले त्यावेळी तोल गेला तर थोडस हसुन आणि लडीवाळपणे बोलत करायला तिने षिकवले असे करुन चालायला, पाऊल टाकायला माऊलीन षिकवल.
अण्णा आपल्या आईच्या असंख्य आठवणी सांगतात षरीराने कृष आणि दुबळा असल्याने आई माझी विषेष काळती घ्यायची मला गोड आवडते हे ध्यानी ठेऊन ते पदार्थ दयायची. आनंदाने हसत भरवायची त्यामुळे षरीराने आपण दुबळे आहोत हे विसरुन जायचो. त्यामुळे मला पांगुळगाडयापेक्षा आईच्या षब्दांचा आणि प्रेमाचा आधार पुढे मला तारकच ठरला. अण्णा सांगतात की मी जरा जरी दुःखी दिसलो तर माझी आई म्हणायची अरे पांडुरंगा तुला काय होतोय. काय दुःखते का असा उदास का बर। तुला बर वाटत नाही का परंतु मला षिकायला पुढे मिळत नाही हे माझे दुःख पाहून माझी आई मला म्हणायची अरे काळजी करु नकोस तुला परमेष्वर खुप षिकायला देईल, तु मोठा होषील आणि नाव कमावषील आई माझी समजूत घालायची मन रिझवायची षिकून माणूस मोठा होतो. हा तिचा आषावाद आणि तिचा आषीर्वादच माझ्या जिवनातील मोठी षिदोरी ठरला असे अण्णासाहेब म्हणायचे. मी षिक्षणासाठी लांब दूर गावी चाललो त्यावेळची तिची अवस्था तिच्या मनाची घालमेल, तिचे पाणी भरलेले डोळे मला आठवतात. माझी आई जात्यावरच्या ओव्या सुंदर म्हणायची त्यापैकी '' बाळ जातो दूर देषा, मन गेल वडावून, आज सकाळ पासून, हात लागेना कामाला, वृत्ती होई वेडयावाणी, डोळयाला माखले पाणी, आणा दुध, दही, लोणी, आणा ताजा भाजीपाला माझ्या लाडक्या लेकाला त्याच्या आवडीचे करा चार पदार्थ सुंदर काही देऊ बरोबर.''
यातुन तिची ओतपोत अषी मायाच पाझरुन दिसते आहे. आईची माया वेडी म्हणतात, कारण आत्यंतिक निरपेक्ष पे्रमाचा त्याला स्पर्ष झालेला असतो.
माझ्या आईच्या हातची केलेली भाजी करडीची भाजी, चवळीची, भव-यंाची भाजी मी आवडीने खायचो त्यापुढे मला पक्वांन्न ही फिके वाटत असे.
माझ्या कार्यात मला उदंड यष मिळाले, किर्ती मिळाली, नाव झाले कार्यकर्ते गोळा झाले, सत्कार होऊ लागले, भाषणे माझ्या वरती लोक देऊ लागले. पण त्या मागे काहीना काही प्रत्येकाचा स्वार्थ असतो. परंतु निरपेक्षपणे आपल्या लेकांच मोठेपण पाहणारी माझी आई माझ्या डोळयासमोरुन तरळून जायची कारण तिला माझ्याकडून काय पाहिजे होते. काही नाही. फक्त प्रेम आणि प्रेमच. तिचे प्रेम आणि आषीर्वादाचे चार षब्द माझे सामथ्र्य आणि षक्ती देणारे माझे ते टाॅनीकच होत. माझ्या यषात, षिक्षणात माझ्यावरच्या संस्कारात तिचाच मोलाचा वाटा आहे. अषी माझी आई अंबिकाबाई होती.
अण्णासाहेबांच्या आवडत्या प्रार्थनाः
अण्णासाहेब हे आपल्या विदयाश्रम वसतीगृहाच्या जवळच रहात होते. विदयाश्रम हे अण्णांनी स्थापन केलेले पहिले वसतीगृह रोज सकाळी पहाटे अण्णांचा दिनक्रम सुरु होत असे आपल्या वसतीगृहातील विदयाथ्र्यांना ते स्वतःहा पहाटे पाच वाजता उठवीत असत. त्या विदयाथ्र्यांचा रोजच्या रोज नित्य नियमाने अभ्यासाकडे त्यांचे लक्ष असे. सकाळी बरोबर 6 वाजता अण्णासाहेब स्वतःहा जातीने विदयाथ्र्यांची प्रार्थना घेत आणि रात्री 8 वाजताही प्रार्थना घेतली जायची. अण्णासाहेब स्वतःहा त्या विदयाथ्र्यांमध्ये मिसळून जायचे त्यांच्यामध्ये बसायचे त्यांना चांगल्या गोष्टी सांगायचे त्यातून त्यांच्या सामान्य ज्ञानामध्ये भर पडावी हा हेतू त्या पाठीमागे त्यांचा होता. अगदी रोजच्या रोज त्यांच्या आयुष्यामध्ये उपयुक्त पडेल अषी माहिती त्या विदयाथ्र्यांना अण्णासाहेब देत असत. त्यातून ते त्या विदयाथ्र्यांच्या लेखनस्पर्धा घेेत असत. त्यासाठी त्यांना विविध विषयावर मार्गदर्षन ते स्वतःहा करीत असत. विविध विषय त्यांना समजावून सांगत आणि मग त्यांची स्पर्धा ते घेत. यातून विदयाथ्र्यांच्या ज्ञानामध्ये भरच पडत असे. परंतु वसतीगृहातील विदयाथ्र्यांना अभ्यासामध्ये तसेच तिथे राहण्यामध्ये गोडी निर्माण होण्यामध्ये प्रार्थनेचे ही तितकेच महत्त्व आहे. कारण अण्णासाहेब नित्यनियमाने प्रार्थनेकडे लक्ष देत असत. विदयाथ्र्यांनी वेळेचा सदुपयोग करुन ध्यानसाधना आणि प्रार्थना याकडे विषेष लक्ष दयावे ही त्यापाठीमागची कल्पना होती. एकाग्रता, बुध्दी, आणि षरीर यांचा समन्वय कसा साधावा यासाठी आणि ध्यानसाधनेचे आणि प्रार्थनेचे महत्त्व विदयाथ्र्यांना अण्णासाहेब पटवून देत असत.
अण्णासाहेबांनी प्रत्येक दिवसाला एक याप्रमाणे सात दिवसाच्या सात प्रार्थना अण्णांनी निवडल्या होत्या. व त्या विदयाथ्र्यांकडून त्या अगदी सुरेल आवाजात म्हणूनही घेतल्या जात असत आजही आपल्या विदयार्थी वसतीगृहात त्या प्रार्थना म्हटल्या जातात. अण्णांना ज्या प्रार्थना आवडायच्या त्यापैकी दोन ते स्वतःहा विदयाथ्र्यांमध्ये बसून म्हणायचे त्या म्हणजे महात्मा गांधीनी तयार केलेली ''वैष्णव जन तो तेणे कहिए'' आणि दुसरी प्रार्थना म्हणजे साने गुरुजींनी तयार केलेली ''खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे''
जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पद दलित
तया जाऊनी उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।।
सदा जे आर्त अति विकल
जयांना गांजती सकल
तया जाऊनी हसवावे। जगाला पे्रम अर्पावे।।
कुणा ना व्यर्थ षीणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे।।
प्रभुची लेकरे सारी
तयाला सर्व ही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे।।
असे हे सार सत्याचे
असे हे सार धर्माचे
परार्थ प्राणहि दयावे। जगाला प्रेम अर्पावे।।
या प्रार्थना अण्णासाहेबांच्या अत्यंत आवडीच्या अषा आहेत. त्यातून म्हणजेच या प्रार्थनेतुन त्यांचा हेतू आणि उद्देष स्पष्ट होतो. आपण जगासाठी चंदना सारखे झिजायचे फक्त प्रेम आणि प्रेमच दयायचे जे का रंजलेगांजले त्याची पददलीतांची सेवा करायची, सत्यवाचा बोलायची यातुन अण्णासाहेबांनी साने गुरुजी आणि गांधीजी यांनी जषी कविता लिहिली त्याचे अनुकरण करायचे व त्या मार्गावर चालण्याचे काम अण्णासाहेब आयुष्यभर करीत राहिले
PadmaShri Anhnasaheb Pandurang Dharmaji Jadhav was commonly known Annasaheb Jadhav. They are nice example for today's youth of Maharashtra. They started a small group of people and bring them it to highest level of success. They spread the educational and development movement in Maharashtra.