Historical Place Patgoan
Maharashtra is the region of historical places.Patgaon is a holy place in Bhudargad taluka of Kolhapur district famous for Mouni Maharaj math and samadhi.This article help you to know more information about this place.
Maharashtra is the region of historical places. Patgaon is a holy place in Bhudargad taluka of Kolhapur district famous for Mouni Maharaj math and samadhi. This article help you to know more information about this place.
प्राथमिक माहिती :-
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले पाटगाव हे एक ऐतिहासिक परंपरा असलेल ठिकाण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु श्री मौनी महाराज यांचे समाधीस्थान आहे. ऐतिहासिक आणि कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यामध्ये सीमेप्रमाणे उभा असलेला रांगणा किल्ला,सारस्वत ब्राम्हणांचे भद्रकाली मंदिर,स्वयंभू मंदिर,पाटगाव धरण,घनदाट जंगल आणि औषधी वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे.
ऐतिहासिक ठिकाण :-
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु श्री मौनी महाराज हे त्या काळी विजापूरचा राजकारभार हाताळत होते.शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटक राज्यामध्ये गेले असता तिथे त्यांची आणि श्री मौनी महाराजांची भेट झाली.काही काळ उलटल्यानंतर श्री मौनी महाराजांनी सर्व गोष्टींचा त्याग करून तपश्चर्येचा मार्ग अवलंबला.याच मौनी महाराजांना छत्रपती शिवरायांनी आपले गुरु मानले.श्री मौनी महाराज यांच्या वास्तव्यामुळेच पाटगाव या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले.मौनी महाराज वास्तव्यास असलेल्या ठिकाणी एक नयनरम्य आणि अतिशय सुंदर कलाकुसर असलेला मठ उभारण्यात आला आहे.या मठासाठी वापरण्यात आलेला दगड हा कोल्हापूर जवळील जोतीबा डोंगर येथून आणण्यात आला.मठामध्ये लाकडावर अतिशय सुंदर आणि कौशल्यपूर्ण असे कोरीवकाम करण्यात आले असून मठाच्या छ्परासाठी तांब्याचे पत्रे वापरण्यात आले आहेत.
मठाच्या मागच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री मौनी महाराज यांच्या भेटीचे ठिकाण आहे.शिवाजी राजे दक्षिणेच्या स्वारीवर जाण्याआधी आपल्या गुरूंचे दर्शन घेण्यासाठी श्री मौनी महाराजांची भेट घेण्यासाठी पाटगाव येथे आले होते.
श्री मौनी महाराज मठाचा इतिहास :-
श्री मौनी महाराजांच्या समाधीनंतर मठाची संपूर्ण जबाबदारी त्यांचे शिष्य तुरुत्गिरी बुवा यांच्याकडे होती.या वेळेदरम्यान स्वामी जगत्गुरू शंकराचार्य शान्केश्वर मठ यांनी श्री मौनी महाराजांच्या मठाची भेट घेतली.१६९४ साली राजाराम महाराजांनी मठासाठी भेट आणि उभारणीसाठी म्हणून पांडूर आणि वास्नुली या गावाचा महसूल जमा करण्याची परवानगी दिली.१७०१ साली राजश्री रामचंद्र पंडित आमात्य यांनी मठाला भेट दिली.तेव्हा या दोन गावांमधून जमा होणार्या महासुलासामंधी अडचणी त्यांना दिसून आल्या.या भेटीमुळे निदर्शनास आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी २५ जुलै १७०१ या दिवशी मठासाठी सनद जाहीर केली या सनदीनुसार मठाला कोडोशी तालुका खानापूर या गावचा महसूल जमा करण्याची परवानगी देण्यार आली.
श्री मौनी महाराज मठाचा कारभार हा शिष्यपरंपरेनुसार चालवला जातो.तुरुत्गिरी बुवा -१७२८,घनशामगिरी, सबलगिरी , सोमेश्वरगिरी-१७५०,लक्ष्मनगिरी -१७७५,भिरावगिरी-१८३६,गंगागिरी-१८५२,भगीरथगिरी -१८६४ ,रामगिरी-१९२०,यानंतर छात्र जगत्गुरू बेनाडीकर पाटील.
ठिकाणासामंधी माहिती :-
ठिकाण :- पाटगाव
तालुका-भुदरगड , जिल्हा-कोल्हापूर.
मुख्य ठिकाणाहून अंतर :- कोल्हापूर-पाटगाव = ८८ किमी
गारगोटी-पाटगाव = 38 किमी
बस स्थानक :- आहे
रेल्वे स्थानक :- कोल्हापूर (८८ किमी)