Friends is the connection of two hearts not two persons
Friends is the connection of two hearts not two persons ,for making a friend neither you have to be rich nor you have to be poor youo just need is a good heart,some people make friends only for their use and then they leave us but as a good person you should not have any feeling of revenge in your mind
मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर
काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
...जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
काय चिज असते नाही ही मैत्री
मी- मी करुन कोणी मोठा होत नसतो
म्हणून वावरतांना, मी पणा टाकायचा असतो
आपल्यापुरते पाहणार्यांपासून आपलेच दूर जातात
कारण काळीज असणार्यांनाच फक्त वेदना होतात.
होत नसतं माझं - माझं म्हणण्यानं, काही घर माझं होत नसतं
...आणि दुसर्याला निंदल्यानं आपल्याला कुणी वंदत नसतं
आपण घरांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचायचा नसतो.
कारण तो ऐकण्यासाठी जवळ कोणी उभा नसतो.
करुन-सवरुन सर्व काही विसरायचं असतं
नाहीतर जीवनाच्या बेरजेचं गणितच चुकलं असतं.
घरात दुसर्यांच्या सुखात सुख पहायचं असतं,
आणि दुसर्यांच्या दु:खात, आपलं दु:ख विसरायचं असतं.
सुरांमध्ये सुर मिसळून कोरसमध्ये गायचं असतं,
आणि आपला तो वेगळा सुर काढून बेसुर गायचं नसतं
आपल्या भावना जोपासताना दुसर्याच्या भावनेची कदर करायची असते.
तेच आपलं कर्तव्य असून, जीवनाचे ध्येय तेथेच घुटमळत असते.
म्हणून माझं माझं म्हणाल्यानं काही माझं होत नसतं,
तुझं-तुझं म्हणाल्यानं काही दुसर्यांचे होत नसतं.
कोणाला कधी हे समजले तर....................