Loan Facility For OBC People By Government Of Maharashtra


This resource is about the loan facility provided by Maharashtra State Government for OBC people in Maharashtra. Read more for information about various loan schemes, eligibility for government loan schemes and contact details for applying to OBC loan schemes.

Maharashtra state government has different loan schemes to help the lower middle class peoples to develop their business. In this article you can find information about for Government loan facility for OBC people in Maharashtra.

प्रिय मित्रानो,

आपल्या महाराष्ट्र राज्यात सुशिक्षित लोक भरपूर आहेत जे कि कामाच्या शोधात आहेत, बेरोजगार आहेत . खरतर त्यांचा राष्ट्राची संपत्ती म्हणून उपयोग होऊ शकतो. व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या आर्थिक सुध्रानेसाठी तसेच स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने "सामाजिक न्याय विभागांतर्गत" इतर मागास्वर्गीयासाठी ( ओ.बी.सी.) "महाराष्ट्र राज्य वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड" ची स्थापना केली

या महामंडळाचे प्रमुख उदिष्ट "इतर मागासवर्गीयांचे सर्वांगीण कल्याण आणि विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या दृष्टीने स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्जपुरवठा करणे" हे आहे.

विविध कर्ज योजना खालीलप्रमाणे:



१) बीज भांडवल योजना - मर्यादा ५ लाखापर्यंत
२) मुदती कर्ज योजना - मर्यादा ३ लाखापर्यंत
३) महिला समृद्ध योजना - मर्यादा ५ लाखापर्यंत
४) मर्जीन मनी योजना - मर्यादा ५ लाखापर्यंत
५) सूक्ष्म पतपुरवठा योजना - मर्यादा ५ लाखापर्यंत
६) स्वर्णिमा योजना - मर्यादा ७५ हजारापर्यंत
७) श्येक्षणिक कर्ज योजना - मर्यादा ५ लाखापर्यंत

लाभार्थी पात्रता:


१) अर्जदार इतर मागासवर्गीय (ओ. बी. सी.) असावा.
२) अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
३) वयोमर्यादा - १८ ते ५० वर्षे
४) वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
५) वार्षिक उत्पन्न - ग्रामीण रु. ४००००/- आणि शहरी ५४०००/-
६) कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ
७) व्यवसायाचा अनुभव असावा.

संपर्क कार्यालय:


या महामंडळाचे पुण्यातील ऑफिस " बंगला क्रमांक ५, दि - १ बिल्डींग, शासकीय वसाहत, हिवताप ऑफिस समोर , ईशान्य मोलाच्या शेजारी , येरवडा, पुणे - ६ " येथे आहे. दूरध्वनी क्र. ०२०- २६६१२५०४

या महामंडळाचे प्रमुख कार्यालय : प्रशासकीय भवन, ४ था मजला, रामकृष्ण चेंबुरकर मार्ग, चेंबूर, मुंबई - ७१. दूरध्वनी क्र. ०२२- २५२७५३७४, २५२९९६८५

तरी माझ्या सर्व मित्रांनो आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या मित्रांना देखील कळवावे.

धन्यवाद

धन्यवाद...


Comments



  • Do not include your name, "with regards" etc in the comment. Write detailed comment, relevant to the topic.
  • No HTML formatting and links to other web sites are allowed.
  • This is a strictly moderated site. Absolutely no spam allowed.
  • Name:
    Email: